ठाणे-बेलापूर रस्त्याला स्थगिती : आयबीएन लोकमत इम्पॅक्ट

January 16, 2009 6:59 AM0 commentsViews: 5

16 जानेवारी, मुंबईनवी मुंबईतला ठाणे बेलापूर रोड पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडलाय. निकृष्ट दर्जाच्या बांधणीमुळे गेल्या तीन वर्षांपासून काम पूर्ण न करणार्‍या कंत्राटदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं, अशी मागणी होत होती. पण उलट त्याच ठेकेदाराला आणखी बावन्न कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला होता. काल दिवसभर आयबीएन लोकमतवर ही बातमी दाखवली गेली. त्याचा परिणाम होऊन अखेर ठाणे-बेलापूर रस्त्याच्या कामाला स्थगिती द्यावी लागली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं ही स्थगिती दिली आहे.

close