गुन्हेगार उमेदवारांच्या प्रचाराची गृहमंत्र्यांवर नामुष्की

June 27, 2013 10:00 PM0 commentsViews: 653

r r patil27 जून : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या 7 जुलैला होतेय. या निवडणुकीसाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत.

मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीनं त्यांची पंचाईत झालीये. दंगल, खून, मारामारी, दहशत, चंदन तस्करी, गुंडगिरी, क्रिकेट बेटिंग असे गुन्हे नोंद असलेल्या लोकांना पक्षानं उमेदवारी दिलीये. आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यातल्या काही उमेदवारांना आजवर गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरवण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे गुंडगिरी करता येत नाही, म्हणून आपल्याला उमेदवारी दिली नाही असा गंभीर आरोप एकाने केलाय.

 

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

मैनुद्दीन बागवान (माजी महापौर) – दंगल
बाळू भोकरे – बेकायदा हत्यार बाळगणे
अल्लाउद्दीन काझी – मोराची तस्करी
जमीर रंगरेज – दहशत माजवणे

close