मुंबई पालिकेत 9 हजार 157 फाईली गायब

June 27, 2013 11:31 PM0 commentsViews: 241

उदय जाधव, मुंबई

27 जून : मुंबई महापालिकेच्या बेपर्वा कारभार आणि भ्रष्टाचार आयबीएन लोकमतने वेळोवेळी उघड केलाय. मुंबईतल्या एक दोन नव्हेत तर तब्बल नऊ हजार एकशे सत्तावन्न बिल्डिंग प्रस्तावाच्या फाईल्स अचानक गायब झाल्या आहे. आणि याची कबुली खुद्द पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागानं माहितीच्या अधिकारात उघड केलीय.

हे आहे मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्तावांची परवानगी देणारं ऑफिस…याच ऑफिसमधून गेल्या डिसेंबर 2006 ते एप्रिल 2013 या पाच वर्षांच्या काळात तब्बल नऊ हजार एकशे सत्तावन्न फाईल्स हरवल्यात. तशी कबुलीच पालिकेने माहितीच्या अधिकारात दिलीय.

बीएमसी प्रस्ताव विभागाने हरवलेल्या फाईल्स

पश्चिम उपनगर 1 – वांद्रे ते जोगेश्वरी 3474

पश्चिम उपनगर 2 – गोरेगाव ते दहिसर 1401

पूर्व उपनगर –  कुर्ला ते मुलुंड / मानखुर्द 4282

पालिकेच्या ऑफिस मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात फाईल हरवल्याने स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केलीय.

बिल्डिंग प्रस्तावांच्या फाईली हरवल्याने सरळ बिल्डरांचाच फायदा होणार आहे. त्यामुळे बीएमसीचे अधिकारी नक्की कोणासाठी काम करतात, असा प्रश्न निर्माण झालाय.

close