मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली

January 16, 2009 10:16 AM0 commentsViews: 4

16 जानेवारी मुंबईने उत्तरप्रदेशचा पराभव करून रणजी ट्रॉफी जिंकली. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईने 38व्यांदा विजेतेपद मिळवले आहे. मॅचच्या शेवटच्या दिवशी 524 रन्सचं टार्गेट गाठताना उत्तर प्रदेशची दाणादाण उडाली. मुंबईच्या टार्गेटचं पाठलाग करताना उत्तरप्रदेशची टीम 281 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे मुंबईने उत्तरप्रदेशवर 243 रन्सने विजय मिळवला.रणजी स्पर्धेचं हे 75 वं वर्ष. आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा मुंबईनेच ही स्पर्धा जिंकली आहे. आजच्या फायनलमध्ये मुंबईच्या वतीने धवल कुलकर्णीने 5 विकेट घेतले.तर रमेश पोवारने 3, झहीर आणि आगरकरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. उत्तरप्रदेशतर्फे बी.कुमारने सर्वात जास्त 80 केले.तर कप्तान कैफने 72 रन्स केले. मुंबईच्या दोन्ही डावात रोहित शर्माने सेंच्युरी केली.

close