रामलिंग राजू यांची सुनावणी सुरू

January 16, 2009 10:21 AM0 commentsViews: 2

16 जानेवारी, हैदराबादसत्यमचे माजी अध्यक्ष राजू यांच्या विशेष कस्टडी साठीच्या सेबीच्या याचिकेवर तसंच पोलिसांच्या याचिकेवर आज सुनावणी सुरू झाली आहे. हैदराबादच्या नामपल्ली कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. रामलिंग राजू, बी रामाराजू आणि सीएफओ वदलामणी श्रीनिवास यांनी दिलेले स्टेटमेंट्स सेबी तपासून पाहणार आहे. तसंच इनसायडर ट्रेडिंग, बनावट ट्रेड प्रॅक्टिसेस आणि इतर काही संदर्भात सेबी कसून चौकशी करणार आहे. सेबीच्या चौकशीसाठी राजू यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसल्याचं राजू यांच्या वकीलांचं म्हणणणं आहे .राजू यांना विशेष दर्जा मिळावा ही राजूंच्या वकिलांनी केलेली मागणी पब्लिक प्रॉसिक्यूटरनी धुडकावून लावलीय. राजू यांनी अनेक निष्पाप सामान्यांची फसवणूक केल्यानं त्यांना विशेष दर्जा मागण्याचा कोणताही हक्क नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलंय. सत्यमचे माजी अध्यक्ष रामलिंग राजू यांची एक दिवसांची विशेष कस्टडी सेबीला देण्याची मंजूरी कोर्टानं दिली आहे.

close