नक्षलवाद्यांकडून पोलीस शिपायाची हत्या

June 28, 2013 1:08 PM0 commentsViews: 141

»naxal34328 जून : गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आसरअली या गावात नक्षलवाद्यांनी संजीव रेड्डी या पोलीस शिपायाला ठार केलंय. काल भर दुपारी नक्षलवाद्यांनी संजीव यांना गोळ्या घातल्या. संजीव हे आसरअली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

आसरअली हे महाराष्ट्राच्या सीमेवरचं शेवटचं पोलीस ठाणं आहे. ते काल दुपारी पत्नीसह मोटार सायकलवरून जात होते. त्यावेळी जिल्हा सहकारी बँकेजवळ चार माओवाद्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्यावर गोळीबार केला. संजीव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली. नक्षलवाद्यांच्या ऍक्शन टीमनं हा गोळीबार केल्याचा अंदाज आहे. आज सिरोंचा तालुका मुख्यालयात संजीव रेड्डीला सलामी दिली जाणार आहे.

close