संस्थाचालकाची गुंडगिरी, IBN लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

June 28, 2013 1:49 PM0 commentsViews: 1435

28 जून : औरंगाबादेतील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर दंड वसूल करणार्‍या वाय.एस.खेडकर इंटरनॅशनल शाळेची बातमी आयबीएन लोकमतनं निर्भीडपणे मांडली. बातमीची दखल घेवून शिक्षणाधिकारी उपासनी यांनी शाळेला भेट देवून शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवलीय. मनमानी लुटीला आयबीएन लोकमतनं लगाम लावला म्हणून शाळेचे संचालक सदस्य राजीव खेडकर यांनी आयबीएन लोकमतचे कॅमेरामन सुधीर जाधव यांच्यावर हल्ला करीत त्याला खोलीत कोंडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम यांच्या अंगावर धावून जात राजीव खेडकर यांनी बघून घेण्याची धमकी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेत पालकांना धमकावून मनमानी पध्दतीनं विद्यार्थ्यांकडून दंड वसूल केला जात होता. पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून निमूटपणे अन्याय सहन करीत होते. मात्र आयबीएन लोकमतला प्रकरण कळताच लुटीचा पर्दाफाश केला. राजीव खेडकर हे शाळेचे सदस्य संचालक आहेत. औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांचे ते मेव्हणे आहे. भागवत कराड यांच्या समोर राजीव खेडकर यांनी कॅमेरामन आणि ब्युरो चीफ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या शाळेच्या विरोधात पालकांनी तक्रार केली मात्र शिक्षण विभागामार्फेत कसलीही कारवाई झाली नाही म्हणून राजीव खेडकर यांची मुजोरी वाढलीय. राजीव खेडकर यांचा मुजोरपणा प्रसार माध्यमांशी असा असेल तर पालक विद्यार्थ्यांसोबत ते काय करत असतील.

 

संबंधित बातम्या

अशीही ‘शाळा’ ट्यूशन ‘फी’वर चक्क दंड !

close