मंगळावर जीवसृष्टी असल्याचे शास्रज्ञांकडे पुरावे

January 16, 2009 12:21 PM0 commentsViews: 3

16 जानेवारीमंगळावर जीवसृष्टी असल्याचे निश्चित पुरावे आता शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. या संदर्भातले निष्कर्श शास्त्रज्ञ आज जाहीर करणार आहेत. मंगळावर प्रचंड प्रमाणात सातत्याने मिथेन गॅस बाहेर पडतोय. याआधी जरी मिथेन गॅस मंगळावर सापडला असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर , सातत्याने, मिथेनचं उत्सर्जन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पेशींच्या चयापचय क्रियेत म्हणजेच मेटाबॉलिझम प्रोसेसमध्ये मिथेनचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असतं. काही भूशास्त्रीय प्रक्रियांमध्येसुद्धा मिथेन उत्सर्जित होत असतो. हा गॅस नेमका कुठून बाहेर पडतोय हे नासाला अजून कळलं नाहीये. पण कुठेतरी सूक्ष्म जीवाष्म असल्याचा अंदाज याबाबत नासाने व्यक्त केला आहे.

close