एमएमआरडीए 2000 घरं भाड्यानं देणार

January 16, 2009 12:26 PM0 commentsViews: 6

16 जानेवारी, मुंबईम्हाडाच्या घरांपाठोपाठ आता सर्वसामान्य लोकांसाठी भाड्याची घरंही उपलब्ध होणार आहेत. एमएमआरडीएनं याकामी पुढाकार घेतलाय. येत्या मार्च अखेरीस दोन हजार घरं कर्जत येथे माफक भाड्यानं उपलब्ध होतील. येत्या डिसेंबरअखेरीस आंबिवली आणि वसई येथेही आणखी तीन हजार घरं भाड्यानं उपलब्ध होणार आहेत. या घरांचं भाडं 800 ते पंधराशे रुपये आहे. तर या घरांचा कार्पेट एरिया 160 स्क्वेअर फूट आहे. येत्या 5 वर्षात टप्प्याटप्याने पाच लाख घरं बांधण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. यासाठी 16 विकासकांनी एमएमआरडीएकडे निवेदन दिलं आहे. त्यापैकी कर्जत येथील तानाजी मालुसरे सिटी डेव्हलपर, आंबिवली येथील निर्मल लाईफ स्टाईल, आणि वसईमध्ये धनश्री डेव्हलपर्स या 3 विकासकांना एमएमआरडीने इरादापत्र जारी केलं आहे.

close