‘गोपीनाथ मुंडेंची चौकशी करावी’

June 28, 2013 7:47 PM1 commentViews: 187

r r patil on mumnde28 जून : गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गोपीनाथ मुंडेंनी 8 कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा केला त्यांचं म्हणणं खरं असले तर मी त्यांचं अभिनंदन करतो. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या विधानाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मनिष तिवारी यांनी केली आहे.

 

गुरूवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विनय सहस्त्रबुद्धे यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्याक्रम पार पडला. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांनी एक गंभीर खुलासा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी 8 कोटी रुपये खर्च केल्याचं मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर होऊ द्या, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत वापरला जाणार्‍या ब्लॅक मनीला आळा घालायचा असेल तर राज्याच्या अर्थखात्यानं निवडणूक प्रचारासाठी फंडिंग करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती.

  • rahul bhoite

    munde ni beed cha lokaanchi mafe magavi

close