एचडीएफसी होमलोनच्या दरात कपात

January 16, 2009 12:33 PM0 commentsViews: 1

16 जानेवारीएचडीएफसी बँकेनं दुसर्‍यांदा होमलोनसाठीचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. मोठ्या प्रमाणावर होमलोन देणार्‍या एचडीएफसी बँकेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येही अर्ध्या टक्क्यानं व्याजदर कपात केली होती. ही नवी व्याजदर कपात नव्या ग्राहकांसाठीदेखील लागू होईल. तीस लाखांपर्यंतच्या नव्या होमलोनसाठी पावणे दहा टक्के व्याजदर असेल. तर तीस लाखांपेक्षा जास्तीच्या होमलोनवर पावणे अकरा टक्के व्याजदर असेल. याबाबतची अधिकृत घोषणा बँक सोमवारी करणार आहे.

close