पेट्रोल 1.82 पैशांनी महागलं

June 28, 2013 8:37 PM0 commentsViews: 232

petrol price hike28 जून : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्यांना आता पेट्रोलियम कंपन्यांनी आज आणखी एक धक्का दिली. पेट्रोलच्या दरात 1 रूपये 82 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. जून महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या अगोदर 2 रूपयांनी दरवाढ करण्यात आली होती. ही दरवाढ व्हॅट वगळता करण्यात आली आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या शहरात पेट्रोलच्या दरात फरक असणार आहे. मुंबईत पेट्रोलमच्या दरात प्रतीलीटर 2.50 रूपये इतकी दरवाढ असणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली ऐतिहासिक घसरणं यासाठी कारणीभूत आहे. रूपयाची घसरण झाल्यामुळे पेट्रोल आयात केलं जातं त्याच्या किंमती महागल्या आहेत त्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

close