भटक्या कुत्र्यांच्या बचावासाठी पामेला अँडरसनचा पुढाकार

January 16, 2009 10:58 AM0 commentsViews: 2

16 जानेवारीभटक्या कुत्र्यांच्या बचावासाठी हॉलिवूडची अभिनेती पामेला ऍन्डरसनने मुंबई महापालिकेला पत्रं पाठवलं आहे. भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला विरोध करायला पामेला पुढे सरसावलीय. पामेलाचं पत्र मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मिळालंय. रस्त्यावरच्या कुत्र्यांना मारू नका, असं आवाहन तिनं केलं आहे.शहरातल्या नागरीकांना त्रास होत असेल तर या कुत्र्यांना मारण्याचा अधिकार महापालिकेला आहे, या कायद्याची तिला माहिती झाली.पेटा या प्राणीमित्र संघटनेने तिच्यापर्यंत ती पोहोचवली. मग, कळवळलेली पामेला पत्रं लिहती झाली. या कुत्र्यांची नसबंदीही करता येईल, हा उपायही या बाईने सुचवलाय. तिच्या या पत्रामुळे आता महापालिकेला आपली भूमिका जाहीर करावी लागेल.

close