जेलमध्ये गुंडाराज !

June 28, 2013 9:33 PM1 commentViews: 639

सुधाकर काश्यप, मुंबई

28 जून : तळोजा इथल्या जेलमध्ये अनेक गँगस्टर आहेत. त्यांना त्या ठिकाणी अनेक सवलती मिळत असतात. एखाद्या गँगस्टरला सवलती मिळाल्या नाहीत पोलीस अधिकार्‍यांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. जेल मधील गुंडांना कायकाय सवलती मिळत असतात. जेल गुंडांचे कसे अड्डे केले आहेत.

जेल म्हणजे गुंडांचे नवे अड्डे झालेत, असा आरोप नेहमीच होत असतो. गँगस्टर अबू सालेमवर झालेला हल्ला हे त्याचं ताज उदाहरण..यापूर्वी तळोजामध्येच जेलर भास्कर कचरे यांच्यावर हल्ला झाला होता. अतिसुरक्षित समजल्या जाणार्‍या तळोजामध्ये अबू सालेम, डी.के.राव, उमेद रेहमान यासारखे नामचीन गुंड आहेत. गुन्हेगारी कारवायांसाठी जेलची हवा खाणार्‍या या गुंडांना जेलमध्येच अनेक सवलतींची खैरात मिळते.

गँगस्टर्सची जेलमध्ये सरबराई

 • - मोबाईल
 • - घरचं जेवण
 • - नॉनव्हेज जेवण
 • - दारू
 • - सिगारेट

या व्यतिरिक्त ही अनेक महत्त्वाच्या सवलती मिळत असतात. मोकळ्या वातारणात फेरफटका मारायला मिळणं, कुटुंबातील व्यक्तिला स्पेशल रुम मध्ये भेटायला मिळणं आणि भेटायला येणार्‍यांशी मुक्त पणे गप्पा मारायला मिळणं.या त्या सवलती आहेत.

एवढचं नाही तर गँगस्टर्स जेलमधून आपल्या टोळ्या निर्धोकपणे चालवत असल्याचंही कायम बोललं जातं.

गँगस्टर्सचे जेलमधले उद्योग

 • - खंडणीसाठी धमक्या
 • - जेलमधील इतर आरोपींकडून खंडणी उकळणे
 • - जेलमध्येच स्वत:चा दरबार भरवणे
 • - कट रचणे

एकंदरीत जेल मध्ये राहून गँगस्टर्स हे सगळे उद्योग करत असल्यामुळे त्यांच्या कृत्यांना जणू एका प्रकारे सरकारी संरक्षण मिळत असतं. अबू सालेमवर झालेल्या हल्लाकडे सरकार केवळ एक घटना म्हणून बघणार की त्यातून काही धडा शिकणार हाच खरा प्रश्न आहे.
 

 • ashwini deokar

  pan mala aas watat ahe ki aapl sarkar kay kart ahe ?????kuthe ahe sarkar aapl

  ya lokanmule maharashtratil sarv samanya mansala dhoka ahe

  jar aasch chlu rahil tar kahi honar nahi aapl n

  ajun ek tumhi media wale jar direstly aas update karu shakta clearly mar ka nahi tumhi sarkar la ha sawal kart bagh tumhi bolalat tar sarkar sudharel sadhhya maharashtralya n sarv jagatlya lokansathi ekch paryay ahe MEDIA kara kahi tari…………………………

close