गोपीनाथ मुंडेंना सत्य बोलणं भोवणार !

June 29, 2013 4:24 PM1 commentViews: 916

14raj329 जून : गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण आठ कोटी रूपये खर्च केले, अशी जाहीर कबुली दिल्यामुळे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विधानाची दखल घेत आता निवडणूक आयोग मुंडेंना नोटीस पाठवणार आहे. नियमांप्रमाणे कोणताही उमेदवार 40 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे प्रचारासाठी खर्च करू शकत नाही.

पण मुंडेंनी स्वतःच नियम तोडल्याचं मान्य केल्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मुंडेंच्या भाषणाची सीडी आयोग बघणार असून त्यानंतरच कारवाई करण्याबाबत निर्णय होणार आहे. मुंडेंच्या या वक्तव्यावर टीका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चैकशीची मागणी केलीये. तर आम आदमी पार्टीनंही मुंडेंच्या इन्कम टॅक्स चौकशीची मागणी केलीय.

गुरूवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विनय सहस्त्रबुद्धे यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्याक्रम पार पडला. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांनी एक गंभीर खुलासा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी 8 कोटी रुपये खर्च केल्याचं मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर होऊ द्या, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत वापरला जाणार्‍या ब्लॅक मनीला आळा घालायचा असेल तर राज्याच्या अर्थखात्यानं निवडणूक प्रचारासाठी फंडिंग करावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती.

 

मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत काय म्हणाले ?

गोपीनाथ मुंडेंचं वक्तव्य आम्ही तपासून पाहू. त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू. काय कारवाई होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.

  • nand

    mundhe jar doshi astil tar election madhe kalya paishala R.R Patil ala ghaltil ka….je sarkar kalya paishan shivay sattevar yeu shakat nahi te kai aala ghalnar ahe R.R Patlana hi mahit ahe

close