‘CM विरोधात फौजदारी गुन्हा दाखल का करू नये’

June 29, 2013 3:49 PM0 commentsViews: 679

fadnavisमुंबई 29 जून : आपत्ती व्यवस्थापनातल्या दुर्लक्षाबद्दल मुख्यमंत्र्यांविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करू नये असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमातल्या गोंधळाबद्दल ते बोलत होते.

राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कसा बोजवारा उडाला याबाबतची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीच दखल घेत फडणवीस यांनी कारवाईची मागणी केली. राज्याचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम मार्च महिन्यात संपला आहे. त्याच्या पुनर्स्थापनेची फाईल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहीसाठी पेंडिंग आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात 40 आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बिनपगारी आहेत. जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षच बंद पडले आहेत. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकारचं हे अक्षम्य दुर्लक्ष असल्याची प्रतिक्रिया आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडूनच व्यक्त होतेय.

close