तुकोबांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

June 29, 2013 1:06 PM0 commentsViews: 75

wari44429 जून : सर्व वारकर्‍यांसाठी सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे वारीचे. त्या वारी सोहळयाला खर्‍या अर्थानं आज सुरुवात होतेय. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून दुपारी साडेतीन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

राज्यातून शेकडो दिंडी देहुमध्ये दाखल झाल्या असून तुकोबा-ज्ञानोबांच्या गजरानं देहूचा आसमंत भरून गेलाय. पावसाचीही बरसात सुरू असल्यानं…वरूण राजाच्या या कृपेमुळे वारकर्‍यांचाही आनंद शिगेला पोहोचलाय. तुकोबांची पालखी निघाल्यानंतर पहिला मुक्काम आज इनामदार वाड्यात असून पालखी उद्या पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान आहे.

close