शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच लाखो पुस्तकं धूळ खात

June 29, 2013 1:01 PM0 commentsViews: 180

parbhani_book329 जून : परभणीत सर्व शिक्षण अभियानाची लाखो पुस्तकं धूळ खात पडली आहेत. सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणारी मोफत पुस्तकं विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी देण्याचे निर्देश आहेत. पण केवळ शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या जिल्ह्यातच लाखो विद्यार्थी या पुस्तकांपासून वंचित राहिलेत. तब्बल 1 महिन्यापासून शिक्षण विभागात ही पुस्तकं धूळखात पडून आहेत.

पहिली ते आठवी पर्यंतची जवळपास दहा लाख पुस्तकं वाटायची राहून गेली आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण खर्चाचा ताण कमी व्हावा म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेत मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना सुरू केली. पण परभणी जिल्ह्यात एकूण 3 लाख 15 हजार 435 एवढी विद्यार्थी संख्या आहे. यांच्यासाठी एकूण 16 लाख 90 हजार 651 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यापैकी तब्बल 15 लाख 52 हजार 323 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून यातील जवळपास दहा लाख पुस्तकं आणखी वाटप करायची राहून गेली आहेत. पहिली ते आठवी पर्यंतची सर्वच पुस्तके ह्यात आहेत आणि ती गेल्या महिन्याभरापासून धूळ खात पडली आहेत.

close