इंडियन मुजाहिदीनच्या आसिफला पुण्यात अटक

January 16, 2009 9:40 AM0 commentsViews:

16 जानेवारी पुणेइंडियन मुजाहिदीनच्या आणखी एका कार्यकर्त्याला मुंबई क्राईम ब्रान्चच्या अधिका-यांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याचं नाव डॉ.आसीफ बागवान असं आहे. इंडियन मुजाहिदीनचे अनेक दहशतवादी पुण्यात राहत होते.यावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था आसीफनं केली होती. काही लोकांचं अपहरण करण्याचाही त्यांचा बेत होता.त्याची तयारीही या डॉक्टरनं केली होती.पुणे ससून रुग्णालयातून डॉक्टरी पास केलेला अन्वर गेल्या अनेकवर्षापासून पुण्यात प्रॅक्टिस करत होता. त्याने पुण्यात भाड्याने घेतलेले दोन फ्लॅट इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या लोकांना दिलेले होते. तसचं आतंकवाद्यांना बेशुध्द करण्याचे इंजेक्शन कसं द्यायचं याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने त्याला अटक केली असून आसिफला आता कोर्टात हजर केलं जाईल.

close