गोविंदा सापडला

January 16, 2009 10:38 AM0 commentsViews: 5

16 जानेवारी वसई मयुरेश वाघ निवडून आल्यानंतर गोविंदानं गेली साडेचार वर्षं आपल्या मतदारसंघाकडं पाठ फिरवली होती. गोविंदा दाखवा आणि बक्षीस मिळवा असेही अनेकदा म्हटलं गेलं.काल मात्र तो एका कार्यक्रमासाठी विरारमध्ये आला. आणि त्यानं विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मातेचं दर्शन घेतलं गोविंदा येत असल्याचं समजताच रातोरात मनसेनं ठिकठिकाणी बॅनर लावले. खासदार गोविंदानं यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना गोलमाल उत्तरंही दिली. माझ्या उपस्थितीपेक्षा विकास महत्त्वाचा असल्याचं त्यानं सांगितलं. आणि विकास झाल्याचा दावाही त्यानं केला. पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना अभिनेता आणि खासदार गोविंदा आहुजा म्हणाला, माझ्यापेक्षा इथल्या भागाच्या विकासाची कामं दिसणं जास्त गरजेचं होतं जी कामं आता दिसतं आहेत.गोविंदामुळे विकास कामं होतील या अपेक्षेनं लोकांनी त्याला निवडून दिलं होतं. पण, त्यानं लोकांची साफ निराशा केली. याचा फटका काँग्रेसला येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

close