तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान

June 29, 2013 6:03 PM0 commentsViews: 660

29 जून :संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान झालं. पालखीचा पहिला मुक्काम आज इनामदारवाड्यात आहे. राज्यातून शेकडो दींडी देहूमध्ये दाखल झाल्यात. तुकोबा-ज्ञानोबांच्या गजरानं देहूचा आसमंत भरून गेलाय. पालखी उद्या पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान आहे.

close