मंदीचा फटका कापूस उत्पादकालाही

January 16, 2009 10:51 AM0 commentsViews: 43

16 जानेवारी,औरंगाबादशेखलाल शेखलाल्या रोगामुळे कापसाचे उत्पन्न घटलंय. त्यातच आर्थिक मंदीमुळे एकही व्यापारी कापूस खरेदी करायला तयार नाही. त्यामळे शेतक-यांना बाजार समितीत कापूस विकल्यावर पैशासाठी एक महिना वाट पहावी लागणार आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यात 45 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालीय. खासगी व्यापारी कापूस खरेदी करतं नसल्यानं पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळावर भार वाढलाय. त्यामळे शेतक-यांना रांगेत ताटळकत बसावं लागतंय. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातून एक लाख गाठींची निर्यात झाली होती. भावही चांगला मिळाला होता. या वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल असं शेतक-यांना वाटत होतं.मराठवाड्यातील 8 जिल्हयात 5 लाख 73 हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आलं होती. परंतु लाल्या रोगामुळे आणि मंदीच्या पटका बसतोय.मंदीमुळे सरकी, रुई ,तेल आणि ढेपींच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक घटकांबरोबर शेतक-यांनाही मंदीचा फटका जाणवतोय.

close