दुष्काळग्रस्त जालन्यात पावसाची हजेरी

June 29, 2013 7:06 PM0 commentsViews: 117

JALNA_FARMING7629 जून : दुष्काळाने होरपळलेल्या जालना जिल्ह्यात यंदा चांगल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. आता शेतकरीही पेरणीच्या कामाला लागले आहेत. एकट्या जालना जिल्ह्यात खरीपाचं पिक साडेपाच लाखांहून अधिक हेक्टर आहे.

त्यापैकी सुमारे दोन लाख हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. इथला शेतकरी आता मशागतीच्या कामाला लागला आहे. गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांना दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. दुष्काळ पडल्याने पिकं हातची गेली आणि मोठा आर्थिक फटका बसला. यंदा पाऊस समाधानकारक पडेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

close