भूखंड घोटाळ्यांबाबत औरंगाबाद पालिका कोर्टात जाणार

January 16, 2009 9:22 AM0 commentsViews: 5

16 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबाद महापालिकेतील भूखंड घोटाळ्यांच्या आणखी काही धक्कादायक कहाण्या पुढे येत आहेत. 70 कोटींहूनही जास्त किमतीची एक जागा बिल्डरला देण्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री तटकरे यांच्या काळात देण्यात आला होता. याप्रकरणी आता महापालिकेने तटकरे आणि संबंधित बिल्डरच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. रविंद्रनगर परिसरातील 70 कोटींपेक्षा जास्त किंमतीची जागा नगरविकास राज्यमंत्री तटकरे यांच्या आदेशाने रुणवाल बिल्डर्सकडे गेली आहे. आणि त्याविरोधात लढा देत आहेत 15 सोसायट्यांधील वयोवृध्द नागरिक. त्यांचा संघर्ष गेली 4 वर्ष सुरू आहे. याबाबत नागरिक कृती समिती अध्यक्ष माधवराव कुलकर्णी सांगतात, हा जो परिसर आहे तो एस के पाटील आणि जी के पाटील यांनी न्यायालयामार्फत विकत घेतला. त्यातील जागा त्यांनी महापालिकेला दान केली. त्याची कागदपत्रेही आमच्याकडे आहेत. तीच जागा आता बिल्डर गिळंकृत करत आहेत. ह्या 3,600 चौरस मीटर जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रं महापालिका आणि सोसायटीकडेही आहेत. तसेच रूणवाल बिल्डर्सकडे जागेची मालकी हक्काची कागदपत्रं आहेत.त्यामुळेच न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. आणि तटकरेंचा निर्णय वादाच्या भोव-यात सापडला आहे.या जागेप्रकरणी रविंद्र नगरमधील नागरिकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयाने तूर्तास बिल्डरची परवानगी रोखली आहे. या खुल्या जागेवर समाजमंदिर बांधून द्यावं, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.

close