‘ ईस्टर्न फ्री-वेला बाळासाहेबांचं नाव द्या’

June 29, 2013 7:47 PM0 commentsViews: 784

bala nandgaonkar on free way29 जून : मुंबईतल्या  ईस्टर्न फ्फ्री-वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या अशी मागणी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. या अगोदरही बाळासाहेबांनी राज्याच्या जडण घडणीत मोलाचं योगदान दिलंय.

 

तसंच राज्य सरकारलाही अनेक सुचना केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याचं नाव एखाद्या छोट्याशा स्टेडियमला देण्यापेक्षा या मार्गाला द्यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केलीय. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना जंग जंग पछाडत असताना मनसेने ही मागणी करत एक प्रकारे शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.

close