संजय दत्त निवडणूक लढवणार

January 16, 2009 6:01 PM0 commentsViews: 1

16 जानेवारी मुंबईसंजय दत्त समाजवादी पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. संजय दत्तनं शुक्रवारी रात्री मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं. मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय दत्त म्हणाला, मी समाजवादी पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे.मी जरी राजकारणी नसलो तरी माझ्या कुटुंबाचे राजकाणाशी संबंध आहेत. अमरसिंग यांच्या आदेशानुसार मी निवडणूक लढवत आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. तसंच गांधी परिवाराशी आमचे संबंध फार पूर्वीपासून आहेत. निवडणूक लढण्यासाठीच्या कायदेशीर तरतुदी मी जाणून घेतल्या आहेत. मी दत्त कुटुंबातील सर्वात मोठा असल्यामुळे मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसंच बहिण प्रिया रागाच्या भरात काही बोलली असेल तर मी तिला माफ केलं आहे. प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. पण परिवार आणि राजकारण एकमेकांसमोर येत असेल तर मी घरातील नात्याला प्रथम पसंती देईन असं तो म्हणाला. संजय दत्तने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंग उपस्थित होते. समाजवादी पार्टीने संजय दत्तला उत्तरप्रदेशधील लखनौ मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

close