कर्नाटक सरकारच्या विरोधात बेळगावात काळा दिन

January 17, 2009 7:14 AM0 commentsViews: 5

17 जानेवारी, बेळगावबेळगावात महामेळाव्यासाठी जमलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारनं काल लाठीमार केला. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवरचा भगवा ध्वज काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडून त्यांना अटक केली. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आज काळा दिन पाळत आहेत. आज हुतात्मा दिनही साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त बेळगावमध्ये लढ्यातील हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी एक रॅलीही काढण्यात आली. गेली 50 वर्ष सीमाभागातील मराठी भाषिक या प्रश्नी लढत आहेत. नेहरूंनी बाळगावचा कर्नाटकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आणि येथे आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनात बेळगावात चार आणि निपाणी परिसरात एक अशा पाच हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात येत आहे.

close