नाशिक:बाळासाहेबांच्या स्मारकाची सेनेची परस्पर घोषणा

July 1, 2013 2:54 PM0 commentsViews: 650

nashik shiv sena_smarakनाशिक 01 जुलै : मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सेनेचे नेते आटोकात प्रयत्न करत आहे. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेनं सत्ताधारी मनसेला झुगारून बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली आहे.

नाशिकमधील इतिहास स्मारकासाठी राखीव जागेवर शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची परस्पर घोषणा शिवसेनेनं केलीय. या ठिकाणी बाळासाहेंबांचं स्मारक व्हावं हा प्रस्ताव शिवसेनेनं मार्च महिन्यात महापालिकेला दिला होता. मात्र मनसेचे महापौर त्याच्या मान्यतेसाठी टाळाटाळ करत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.

म्हणून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आज स्वत:च या ठिकाणी बाळासाहेबांची प्रतिमा ठेवली आणि फलक लावला. जोपर्यंत या स्मारकाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत महापालिकेची एकही सभा होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

(सविस्तर बातमी लवकरच)
 

close