उत्तराखंडमध्ये बचावकार्य अंतिम टप्प्यात

July 1, 2013 3:01 PM0 commentsViews: 355

utrakhand 26 june 1301 जुलै : उत्तराखंडमध्ये आता बचावकार्य जवळपास संपत आलंय. मात्र अजून 2500 यात्रेकरू अडकलेले आहेत. बद्रीनाथ आणि हर्शील या ठिकाणी हे यात्रेकरू मुख्यतः अडकलेले आहेत. मात्र, अजून 3000 जण बेपत्ता असल्याचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनीच जाहीर केल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

दुसरीकडे, प्रलयानंतर रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे केदारनाथमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य दिलं जातंय. त्याचवेळी पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत 1 लाख 4 हजारापेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली. महाप्रलयात अधिकृत मृतांचा आकडा 1000 सांगण्यात आलाय पण मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात आली होती. आता एकीकडे बचावकार्य संपत आलंय त्यामुळे एकूण आकडा किती याचा शोध घेतला जात आहे.

close