अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या निवडणुकीत कलमाडी पराभूत

July 1, 2013 1:31 PM0 commentsViews: 260

kalmadi01 जुलै : कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी आरोपी सुरेश कलमाडी यांचा आशियाई अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. कतारचे दहलन जुम्मन अल हमाद यांनी कलमाडींना 2 मतांनी हरवलंय. हमाद यांना 20 तर कलमाडींना 18 मतं पडली.

 

कलमाडी गेले 13 वर्षं आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. पुण्यात येत्या 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान आशियाई स्पर्धा होत आहे. अल हमाद हे कतार ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. तसंच आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. या अगोदरच कलमाडींना या स्पर्धेपासून जाणीव पूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला होता. कॉमनवेल्थ गेम्सला गालबोट लावलंय त्यांना या स्पर्थेच्या नियोजनामध्ये सामिल केले जाणार नाही असं थेट व्यक्तव क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी स्पष्ट केलं होतं.

close