काकाकडूनच अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

July 1, 2013 1:15 PM0 commentsViews: 1648

nagar rape01 जुलै : अहमदनगरमध्ये एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या 34 वर्षीय काकानंच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आलाय. या काकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाऊचं आमिष दाखवून काकानं हा घृणास्पद प्रकार केलाय. विशेष म्हणजे पोलीस ही तक्रार दाखल करवून घ्यायला टाळाटाळ करत होते. आणि शासकीय रुग्णालयातही उपचार करायला तयार नव्हते. त्यानंतर बर्‍याच तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पीडित मुलीच्या काकाला अटक केली.

चंद्रपूरमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चंद्रपूरमध्येही अशीच घटना घडलीय. एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्या पतीनंच बलात्कार केला. फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तिचं अपहरण केलं आणि सलग 13 दिवस तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान तो तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही देत होता. या मुलीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पण या पीडित मुलींला शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता. तर या प्रकरणाची पोलीस ही तक्रार दाखल करवून घेण्यास टाळाटाळ करत होते. अखेर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी निदर्शनं केली आणि पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन केलं. आम आदमीच्या कार्यकर्त्यांच्या दबावानंतर पोलिसांनी या काकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली.

close