काबुलमध्ये जर्मन दूतावासावर बॉम्बहल्ला

January 17, 2009 8:13 AM0 commentsViews: 1

17 जानेवारी, काबुलअफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये जर्मन दूतावासावर बॉम्बहल्ला झाला. या हल्ल्यानंतर जर्मन दूतावासात मोठी आग लागली. या घटनेत किमान चार अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत. अमेरिकी ल्ष्करी तळाच्या समोरच जर्मन दूतावास आहे.या हल्ल्यात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. फायर ब्रिगेड आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या घटनेसंबंधी अधिक माहिती देण्यास जर्मन दूतावासाचे प्रेस ऑफिसर फिलिप वॅन्डेल यांनी नकार दिला आहे.

close