उद्धव ठाकरेंनी धरला फेर

July 1, 2013 5:21 PM0 commentsViews: 1345

01 जुलै :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष वारीमध्ये फोटोग्राफी करण्याचा अनुभव घेतलाय. मात्र आज वारीत सहभागी होण्याचा अनुभव घेण्यासाठी ते पुणे आळंदी रस्त्यांवर थेट वारीमध्ये सहभागी झाले. थोरल्या पादुका जीथे माऊलींची आरती केली जाते. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. माऊलींचं दर्शन घेउन त्यांनी बबनराव पाचपुते यांच्याशी फुगडीही खेळली. वारी करण्याची इच्छा आहे ती पुर्ण झाली नसली तरी काही प्रमाणात वारीचा आनंद घेण्याचा अनुभव मिळाला.

close