सूरज पांचोलीला अखेर जामीन मंजूर

July 1, 2013 5:46 PM0 commentsViews: 221

suraj pancholi01 जुलै : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीला अखेर जामीन मंजूर झाला. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर  त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पण पांचोलीला देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून त्याला आपला पासपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच एक दिवसाआड पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.

 

3 जून रोजी अभिनेत्री जिया खानने आपल्या राहत्याघरी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. जिया च्या निधनानंतर दोन दिवसांनी तिच्या रूममध्ये एक पत्र सापडलं. तिच्या घरच्यांनी ते पोलिसांकडे सुपूर्द केलं. या पत्रात प्रेमभंग झाल्यामुळे जियाने आत्महत्या केली असा संशय व्यक्त करण्यात येतोय. मात्र तिच्या आत्महत्येला सूरज पांचोलीच जबाबदार आहे असा आरोप जियाच्या आईने केला होता. जियाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर सूरजला 10 जून रोजी अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर सूरजला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली होती. सूरजला अटक झाल्यानंतर जामीन मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेरीस आज सूरजला सशर्त जामीन देण्यात आला.

close