‘फ्री वेला कुणाचंही नाव देऊ नका’

July 1, 2013 7:57 PM2 commentsViews: 611

prakash ambedakar on free way01 जुलै : ईस्टर्न फ्री वेच्या नामकरणावरून चांगलाचा वाद रंगलाय. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी मनसेनं या नव्या फ्री वेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. पण, इस्टर्न फ्री वेला बाळासाहेबांचं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मनसेला शह देण्याचा प्रयत्न केला.

 

हा वाद सुरू असतानाच भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या फ्री-वेला कुणाचंही नाव देऊ नये अशी भूमिका मांडली आहे. मुंबईत याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव एका मुख्य रस्त्याला आहे. असं असताना पुन्हा एका रस्त्याला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी करणं म्हणजे निव्वळ राजकारण आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या

 

» ईस्टर्न फ्री-वेच्या नावावरून मनसे-रिपाइंत जुंपली

 • akash

  kiti devas aapan smarake va rastyanche nave ya vadavar bhandnar aahot maharashtrachya vikasache kay ka fakt asech binkamache vadvivad karayche

 • पुरुषोत्तम आगवण

  कितीही उत्तुंग व्यक्तिमत्त्व असले तरी
  त्या नावांचा वापर निव्वळ राजकारण म्हणून , मतपेटीवर डोळा ठेवून, श्रेय मिळवण्या
  साठी होणार असेल व त्यातून माणूस माणसाच्या जीवावर उठणार असेल तर ते त्या
  महामानवाला तरी खरंच किती आवडेल. आपल्या वडिलांचे नाव देण्याचा मोह टाळत आपण
  घेतलेल्या भूमिकेबद्दल आपले अभिनंदन.
  त्यापेक्षा अशा
  कुठल्याही महानिर्मितीला सर्वधर्म / प्रांत/ जाती / भाषा या पलीकडील – शांतीपथ, मैत्रीमार्ग, विजयपथ, आनंद सेतू, – किंवा साधे – पूर्व मुक्त महामार्ग – Eastern freeway अशी कुठलीही साधी नावे का देऊ नये.

close