वाशिममध्ये शिकार्‍यांची गोळी लागून महिला जखमी

January 17, 2009 6:17 AM0 commentsViews: 3

17 जानेवारी, वाशिमहरणाची शिकार करणार्‍या शिकार्‍याची गोळी लागल्यानं महिला जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. राजूरा गावातल्या रेहाना कौतूब या महिलेला ही गोळी लागली. मात्र गोळी झाडणारे श्रीमंत कुटुंबातले तरुण असल्यानं पोलिसांनी अजून काहीही कारवाई केलेली नाही असा आरोप होतोय. रेहानावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक बंदुकही सापडली आहे. मात्र अजून कुणालाही या प्रकरणी अटक झालेली नाही.

close