ब्राझीलच चॅम्पियन

July 1, 2013 8:30 PM0 commentsViews: 118

barzhil343456401 जुलै : कॉन्फेडरेशन कप फायनलमध्ये इतिहास घडलाय. ब्राझिलच्या मॅरकाना स्टेडियमवर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर तुफान विजय मिळवत ब्राझिलनं फुटबॉल जगतातील गतवैभव परत मिळवलंय. वर्ल्ड चॅम्पियन आणि युरोपियन चॅम्पियन स्पेनचा दणदणीत पराभव करत ब्राझीलनं कॉन्फेडरेशन कपचं तब्बल तिसर्‍यांदा जेतेपद पटकावलंय.

खचाखच भरलेल्या मॅरकाना स्टेडियमवर शेवटच्या मॅचमध्ये ब्राझील आणि स्पेन एकमेकांना भिडणार होते. आणि ब्राझीलच्या फॅन्सना जल्लोषासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. मॅचच्या दुसर्‍याच मिनिटाला फ्रेडनं गोल करत ब्राझीलला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

तर सहाव्या मिनिटाला फ्रेड आणि ऑस्करनं पुन्हा एकदा स्पॅनिश गोलपोस्टवर आक्रमण चढवला पण या अप्रतिम शॉटचं गोलमध्ये ते रुपांतर करु शकले नाहीत. तर स्पेनला ब्राझीलच्या गोलपोस्टवर हल्ला चढवण्यासाठी तब्बल 41 मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. पण त्यांना गोल काही करता आला नाही.

तर दुसरीकडे हाफ टाईमच्या एक मिनिट अगोदरचं न्येमारनं त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. आणि कासिलासची भिंत भेदत त्यानं ब्राझीलसाठी दुसरा गोल नोंदवला. हाफ टाईमनंतरही ब्राझीलचा आक्रमण सुरुच राहिला. सेकंड हाफच्या दुसर्‍याच मिनिटाली फ्रेडनं पुन्हा एकदा कासिलासला चकवा देत ब्राझीलचा तिसरा गोल नोंदवला.

मॅचच्या 53 व्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी मिळालीही, पण सर्जिओ रॅमॉसचा शॉट गोलपोस्टवर गेलाच नाही. तर 23 मिनिटं बाकी असताना स्पेनला आणखी एक धक्का मिळाला. पिकेला रेफ्रींना रेड कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला. आणि स्पेनला 11 प्लेअर्ससह खेळावं लागलं.

दोन्ही टीम्सना यानंतर गोल करायच्या अनेक संधी मिळाल्याही पण कोणालाही गोल करत आला नाही आणि अखेर तो क्षण आला.
वर्ल्ड चॅम्पियन्स आणि युरोपियन चॅम्पियन्स स्पेनचा 3-0 नं फडशा पाडत ब्राझीलनं तब्बल तिसर्‍यांदा कॉनफेडरेशन कपचं जेतेपद पटकावलं आणि या फुटबॉलप्रेमी देशाला त्यांचं गतवैभव परत मिळवून दिलं.

close