मेहतरांचा 10 जुलैपासून काम बंदचा इशारा

July 1, 2013 9:41 PM0 commentsViews: 100

MEHTAR AGITATION_andiolan01 जुलै : पंढरपूर शहरातील उघड्यावर होणारी अस्वच्छता स्वच्छ करणार्‍या मेहतर समाजाने आपल्या मागण्यांसाठी ऐन आषाढीच्या तोंडावर आंदोलनाचे हत्यार उपसलंय. एक जुलै पासून धरणे आंदोलन सुरु केलंय.

 

जर आश्वसान पुर्ण झालं नाही तर 10 जुलै पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मेहतर समाजाने दिलाय. या मुळे वारीच्या काळात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील मेहतर समाजाने आपली राहती घरे आपल्या नावावर करुन द्यावी अशी मागणी करत आहे. गेल्या आषाढी यात्रेच्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रश्न निकाली काढू असं आश्वासन दिलं होतं. पण त्याची पुर्तता झालेली नाहीय.

close