ओबामांच्या शपथविधी समारंभांचं चेन्नईच्या तरुणीला आमंत्रण

January 17, 2009 9:49 AM0 commentsViews: 2

17 जानेवारी, चेन्नईबराक ओबामा यांचा येत्या मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी शपथविधी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास 20 लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यात चेन्नईतल्या एका कॉलेज तरुणीचा समावेश आहे. तेजस्वी रवी असं या तरुणीचं नाव आहे. 'ग्लोबल यंग लिडर्स कॉन्फरन्स' ची ती सदस्य आहे."एका मोठ्या समारंभात भाग घेण्याची कल्पना काही औरच असते. तो दिवस माझ्यासाठी खरोखरच ऐतिहासिक ठरणार आहे. त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम, अल गोर आणि कॉलिन पॉवेल यांची भाषणं हे सर्व रोमांचकारी आहे. मला वाटतं यात भाग घेतल्यानं माझ्या ज्ञानात खूप भर पडेल." असं तेजस्वीनं सांगितलं.आपल्या मुलीवर तिची आईपण खुश आहे. "मला वाटतं ती खरोखरच नशीबवान आहे. मला खात्री आहे ती या संधीचा चांगला वापर करेल." असं तजस्वीची आई मल्लिका रवी यांनी सांगितलं.तेजस्वीच्या कर्तृत्वाचा सगळ्याच भारतीयांना अभिमान आहे. चला आपणही आशा करुया तेजस्वी या संधीचा निश्तितच चांगला वापर करेल, असा सगळ्यांनाच विश्वास आहे.

close