IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर ‘त्या’ शाळेचं स्थलांतर रद्द !

July 1, 2013 9:52 PM0 commentsViews: 135

BULDHANA_SCHOOl3401 जुलै : बुलडाण्यात सवदड गावात शाळा स्थलांतर विरोधात गावकर्‍यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं आहे. या गावातील शाळा आहे त्या जागेपसून 27 किलोमीटर नेण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला होता. त्याविरोधात गावकर्‍यांनी उपोषण सुरू केलं होतं. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर माध्यमिक शिक्षण अधिकारी एस. सी. पवार यांनी गावकरी आणि विद्यार्थ्यांना भेट घेतली आणि या भेटीनंतर शाळा स्थलांतर होणार नसल्याचं लेखी पत्र गावकर्‍यांना दिलं. हे पत्र मिळाल्यानंतर गावकर्‍यांनी आमरण उपोषण सोडलंय.

राज्यातल्या बहुतेक सगळ्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील सवदड गावातील स्वर्गीय भास्करराव शिगणे माध्यमिक शाळा अजूनही उघडण्यात आलेली नाही. याचं कारण म्हणजे ही शाळा आहे त्या गावापासून 27 किलोमीटर अंतरावर नेण्याचा निर्णय संस्थाचालक वसंत मगर यांनी घेतला होता. मात्र असा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी गावात कुठलाही ठराव घेतला नाही. गेल्या तेरा वर्षांपासून या गावात असलेली ही शाळा 100 टक्के अनुदानित आहे. आणि दरवर्षी या शाळेचा निकाल 90 टक्के असतो. असं असूनही शाळाचं ठिकाण बदलण्याच्या निर्णयानं गावकरी चक्रावून गेलेत. आता या सगळ्या विरोधात विद्यार्थी आणि गावकरी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जोपयंर्त शाळेची जागा बदलण्याचा निर्णय स्थगित होत नाही तोपर्यंत गावकरी उपोषणावर ठाम होते. अखेर आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आपला निर्णय मागे घेत गावकर्‍यांनी दिलासा दिलाय.

close