‘एमबीए’च्या नावाखाली चक्क डिप्लोमा?

July 1, 2013 10:01 PM0 commentsViews: 693

wlci3401 जुलै : पुण्यामध्ये एमबीए कोर्सच्या नावाखाली चक्क डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंटचा कोर्स चालवला जात असल्याचा आरोप होत आहे. शहरातील डब्ल्युसी या संस्थेविरोधातही काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या सगळ्या कोर्सेसना विद्यापीठ आणि AICTE मान्यता नाही तसंच खोट्या जाहिराती करुन प्लेसमेंटचं आमिष देखील दाखवलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.

या सगळ्या प्रकारामुळे लाखो रूपये फी आकारून या संस्थांनी फसवणूक केल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. WLC ने मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. विद्यार्थी ब्लॅकमेल करतायत तर संघटना गुंडगिरी करतायत असा प्रत्यारोप संस्थाचालकांनी केलाय. ही सगळी भांडणं आता पोलीस स्टेशनमध्ये पोचलंय. आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना सल्ला सतर्कतेने प्रवेश घेण्याचा दिला. मान्यता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

close