माजी नगरसेवकाने अभिनेत्रीला फसवून केलं दुसरं लग्न

July 1, 2013 10:23 PM0 commentsViews: 4499

01 जुलै : पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न करण्याचा प्रताप आपण सिनेमातून पाहतच असतो. ती तर झाली सिनेमाची गोष्ट पण एका अभिनेत्रीच्या आयुष्यात असाच प्रयोग सत्यात उतरल्याने तिने संताप व्यक्त केला आहे. आणि ज्याने फसवले त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्मिता गोंदकर असं या अभिनेत्रीचं नावं असून तिला पनवेलचे काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धार्थ बांठिया याने विवाहित असल्याचं लपवून तिच्याशी विवाह केला. पण ही बाब काही दिवसानंतर उघड झाल्यामुळे स्मिताने पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षाकडे तक्रार दाखल केलीय. सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवून देतो असं आमिष सिद्धार्थने स्मिताला दाखवलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी सिद्धार्थने स्मिताकडे लग्नाची मागणी घातली. सिध्द्धार्थचं पहिलं लग्न झालं आहे, पहिल्या बायको पासून त्याला दोन मुलं सुद्धा आहेत ही माहिती स्मिताला लग्न केल्यानंतर काही दिवसांनी कळली. जेव्हा स्मिताने सिद्धार्थकडे याची विचारपूस केली तेव्हा त्याने आपण पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याची कागदपत्र दाखवली. पण ही घटस्फोटाची कागदपत्र खोटी असल्याचं स्मिताच्या लक्षात आलं. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर स्मिताने पोलिसांकडे तक्रार केली. सिद्धार्थने जर इतर कुणा मुलीची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी पुढं येण्याचं आवाहन स्मिताने केलं आहे. पुणे पोलीस सुध्दा सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करणार आहे.

close