लखनौमध्ये संजय दत्तचा रोड शो

January 17, 2009 10:10 AM0 commentsViews: 3

17 जानेवारी, लखनौनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर संजय दत्तने लखनौमध्ये रोड शो केलो. पूर्ण शहरात संजयचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्याची पत्नी मान्यता, जयाप्रदा, समाजवादी पक्षाचे नेत अमर सिंग आणि खासदार जया बच्चनही त्यांच्या सोबत होत्या."इथे येऊन मला खूप आनंद झाला. मला इथेच काम करायचंय आणि मी सतत लखनौवासियांच्या संगतीत राहीन. लखनौवासियांनी माझ्याकडून गांधिगिरी शिकावी. मी येथे सर्वांना 'जादू की झप्पी' देईन आणि घेईनही" असं संजय दत्त म्हणाला.

close