BMC अधिकारी-बिल्डरांचं संगमनत

July 1, 2013 11:05 PM0 commentsViews: 418

01 जुलै : मुंबई महापालिकेनं पावसाळ्याच्या तोंडावर इमारतींच स्ट्रकचरल ऑडिट करुन घेण्याचं जाहीर केलं. मात्र हे ऑडिट करताना महापालिका काही ठिकाणी बिल्डर्सना मदत करताना दिसतेय. अंधेरीच्या तोडी सोसायटीत पागडी पद्धतीने राहणार्‍या रहिवाशांनी वैतागून सोडून जावं या हेतून बिल्डर इमारत दुरुस्तही करत नाही. रहिवासी 2008 पासून महापालिकेला इमारत दुरुस्तीसाठी परवानगी मागतायत महापालिका परवानगी देत नाही. अखेर हे रहिवासी कोर्टात गेलेत. त्यात भर म्हणून महापालिकेनं या इमारतींच वीज आणि पाण्याचं कनेक्शन तोडलंय. अशा साधारण 84 इमारतींना चुकीच्या पद्धतीत नोटीस दिली असण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे महापालिकेतल्या भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात आता मुंबईकर पेटून उठतील असं दिसतंय.

close