धनंजय मुंडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा

July 2, 2013 3:15 PM1 commentViews: 2048

dhanajay munde02 जुलै : भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे सत्य बोलल्यामुळे वादात अडकले आहे तर दुसरीकडे त्यांचे पुतणे धनंजय मुंडेंनी अपेक्षितपणे धक्का दिलाय. धनंजय मुंडे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता धनंजय मुंडेंनी आपल्या काकांना थेट आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जर आदेश दिले तर गोपीनाथ मुंडेंच्या विरोधातही लढायला तयार आहोत असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं.

बीड जिल्हा म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला…पण त्याच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याच पुतण्याने रणशिंग फुंकले आहे. वर्षभरापूर्वी धनंजय मुंडे यांनी काकांवर नाराजी उघड केली होती. इतकी वर्ष पक्षाची सेवा करून पक्षात योग्य स्थान दिलं नाही अशी नाराजी व्यक्त करत धनंजय मुंडें यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. एव्हान बीडमध्ये राष्ट्रवादीच्या एका जाहीर सभेत अजित पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी व्यासपीठावर हजेरी लावली आणि आपण राष्ट्रवादीत दाखल झालोत असा इशाराच दिला. धनंजय मुंडे भाजप सोडणार हे उघड होतं.

राष्ट्रवादीने गेल्या वर्षभरापासून बीडवर लक्ष केंद्रीत केलंय. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बीडमधील छोट्यामोठ्या निवडणूक लढवल्या गेल्यात. अलीकडेच राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवगिरी बंगल्यावर एक बैठक घेतली. या बैठकीनंतर गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडेंनी आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला.

मी कधीच काकांचे टोमणे ऐकले नाही आणि ऐकायलाही आले नाही. भाजपसोबत गेल्या वर्षाभरापासून संबंध ठेवला नाही ना कोणतेही काम पडले नाही. स्वाभाविक त्यांच्या आमदारकीचा काही उपयोग नव्हता. राजीनामा या अगोदरच द्यायचा होता फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि आज अखेर ती वेळ आली म्हणून आज राजीनामा दिला असं धनंजय मुंडे म्हणाले. तसंच पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष ठरवतील. मी एक कार्यकर्ता आहे, मला जे आदेश मिळेल ते मी करणार अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली. धनंजयनं विधानपरिषदेचा सदस्य पदाचा राजीनामा विधापरिषद सभापतींकडे सादर केलाय. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होऊन गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय असा सामना रंगणार आहे. आता पक्षानं उमेदवारी दिल्यास काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा किंवा बहिण पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सांगत धनंजयनं गोपीनाथ मुंडेंना थेट आव्हान दिलंय.

  • deven

    best luck,,,,,,,,,,,,,

close