उत्तराखंड:17 दिवसांनंतर बचावकार्य संपलं

July 2, 2013 2:27 PM1 commentViews: 452

utrakhand today 2 july02 जुलै :उत्तराखंडमध्ये महाप्रलयामुळे अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे रेसक्यु मिशन अखेर 17 दिवसांनंतर संपलंय. बद्रीनाथमधल्या अडकलेल्या यात्रेकरूंचा शेवटचा गटाला आज बाहेर काढण्यात आलं. आजपासून स्थानिकांच्या पुनर्वसनाला सुरुवात झाली आहे.

साथीचे आजार पसरू नये यासाठी मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहे. राज्याच्या प्रभावित भागांची पुनर्बांधणीही करण्याचं आव्हानही राज्य सरकारसमोर आहे. दरम्यान, बेपत्ता लोकांची संख्या 3000 आहे, 10 हजार नाही असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्री बहुगुणा यांनी स्पष्ट केलंय. या महाप्रलयात 1000 लोकांचा मृत्यू झाला असा असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. या संपूर्ण बचावकार्यत हवाई दलाच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून हजारो यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढलं. तब्बल 75 हजार लोकांना वाचवण्याचं काम जवानांनी केलं.

  • suraj

    nikhil sir he khup pramanik patrakar aahet………majhya sathi ek praerna strot aahe ……………pan ek goshta mala kadat nahi ke uttarakhandat chalu aasalalya bachavkaryat je yogdan sangacha aahe (R.S.S.) kiva chalu aasalale prayatna aata paryanta news channel war ka dakhavnyat nahi aale………….
    kay fakta paid news aasal tarach te dakhawalya jatata…………..
    kay yabaddal khara kiva khota kay he kadu shaknar??

close