भारतीय दिशादर्शक उपग्रहाची यशस्वी भरारी

July 2, 2013 1:34 PM0 commentsViews: 227

istro02 जुलै : इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. इस्रोनं सोमवारी मध्यरात्री आयआरएनएसएस-1ए (IRNSS-1A) या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यासाठी पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलचा वापर करण्यात आला. सोमवारी रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी श्रीहरिकोटाहून सतीश धवन स्पेस सेंटरमधून पीएसएलव्हीनं यशस्वी उड्डाण केलं.

संपूर्णपणे फक्त दिशादर्शनासाठी असलेला उपग्रह सोडणारा भारत आता जगातला सहावा देश ठरलाय. या उपग्रहामुळे जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही ठिकाणच्या हालचाली अधिक अचूकपणे टिपता येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा मागोवा, वाहनांचे व्यवस्थापन आणि समुद्रातलं दिशादर्शन यासाठी हा उपग्रह विशेष उपयोगी ठरणार आहे. या उपग्रहामुळे भारतात आणि भारताबाहेर 1500 किमी अंतरापर्यंतच्या भागातली माहिती मिळवणं शक्य होणार आहे. मुख्य म्हणजे हा उपग्रह संपूर्णपणे भारतानं विकसित केलेला आहे. इस्रो दहा वर्षांच्या कालावधीत या प्रकारचे एकूण सात उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

close