सेना भाजप युतीत तणाव

January 17, 2009 11:37 AM0 commentsViews: 7

17 जानेवारी मुंबईविनोद तळेकर सीमाप्रश्नावरून रामदास कदम यांनी महाराष्ट्रात भाजपशी असलेली युती तोडण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.गेले काही दिवस दोन्ही पक्ष नवीन मित्राच्या शोधात होती. या पार्श्वभूमीवर सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या इशा-याला दिलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जातोय. शिवसेनेचे नेते रामदास कदम बेळगावात असून तेथे त्यांनी भाजपला बेळगाव आंदोलनाबाबत त्वरित भूमिका घेतली नाही तर युती तोडू असा इशारा दिला होता. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पदाधिका-यांशी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं, बेळगावात रामदास कदम यांनी भाजपला जो इशारा दिला आहे, हीच शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे. यावर वेगळं काही सांगायचं असल्यास आम्ही नंतर सांगू, पण सध्यातरी आमची हीच भूमिका आहे.सीमा भागातील मराठी माणसांच्यामागे शिवसेना नेहमी उभी असते. सीमावर्ती भागातील प्रश्नी शिवसेनेनं नेहमी आंदोलनं केली आहेत. आता सीमा प्रश्न राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापर्यंत पोहचवण्याचाआम्ही प्रयत्न करू. तसंच लालकृष्ण आडवाणी यांच्याबरोबरही चर्चा करू. असं असलं तरी शिवसेना, सीमा आंदोलनाबाबत नक्की कोणती भूमिका घेणार, आंदोलनाचा पवित्रा काय असणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं नाही.

close