मायनिंगप्रकल्पामुळे कळणे गावात तणाव

January 17, 2009 11:06 AM0 commentsViews: 5

17 जानेवारी कळणेतळकोकणात प्रस्तावित असलेल्या मायनिंग प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या मिनरल्स ऍन्ड मेटल्स कंपनीच्या अधिका-यांना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घेराव घातला. शासनाने मायनिंग प्रकल्पासंबंधात काढलेल्या जी आरची ग्रामस्थांकडून होळी केली. ही होळी चालू असताना हा अधिकारी तिथे आला होता. आपण जमीन मालक आहोत असं या कर्मचा-याने सुरुवातीला गावक-यांना सांगितलं.पण गावक-यांनी त्याचा हा खोटेपणा त्याला गावच्या देवळात नेऊन उघड केल्यावर या कर्मचा-याने ग्रामस्थांची माफी मागितली. त्यामुळे कळणे गावात सध्या तणावाचं वातावरण आहे.या आधी तीन वेळा झालेल्या जनसुनावणीच्यावेळी ग्रामस्थांनी या मायनिंग प्रकल्पाला विरोध केला आहे. पोलिसांनीही कंपनीच्या अधिका-यांना या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत त्या जागेत जायचं नाही असं बजावलं आहे.

close