पुण्यात पालख्यांचा मुक्काम

July 2, 2013 5:51 PM0 commentsViews: 193

02 जुलै : पुण्यात दाखल झालेल्या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गूरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सकाळचे नित्योपचार पार पडलेले आहेत. आता दर्शनासाठी पुणेकरांनी रीघ लावली आहे. सोमवारी पुण्यात दोन्ही पालख्या दाखल झाल्या. पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांनी दोन्ही पालख्यांचं पुण्यनगरीत स्वागत केलं. जयघोषात माऊलीचं आणि तुकोबाच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. ज्ञानोबाची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी पोहचली आहे. पालखीचा आजचा मुक्काम पुण्यात असणार आहे. बुधवारी सकाळी माऊलींची पालखी सासवडकडे प्रस्थान करेल तर तुकोबारायांची पालखी हडपसरच्या दिशेनं लोणीकाळभोरला निघेल.

close